माझा परिचय

नमस्कार, मी अभिजीत राजेंद्र दगडे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, समाजातील सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी आपुलकीने जोडले जाणे, हीच माझ्या जीवनाची खरी ओळख आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते माता-भगिनींपर्यंत प्रत्येकाच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभे राहणे आणि संकटात धावून जाणे, हेच मी माझे कर्तव्य मानतो.
गेल्या ८ ते १० वर्षांपासून बावधन, भुसारी कॉलनी आणि परिसरातील नागरिकांसाठी दिवस-रात्र एक करून काम करत आहे. माझ्या कामाची प्रेरणा ही केवळ राजकारण नसून, माणुसकी, जबाबदारी आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आहे.

सर्व सामान्यांच्या पाठीशी राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी आपल्या प्रभाग क्र. १० मधून इच्छुक आहे. आपल्या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळेच विकासाचा मी प्रश्न सोडवू शकणार आहे आहे. निस्वार्थपणे काम करत असताना, आपण सर्वांनी आतापर्यंत मला लाखमोलाचे सहकार्य केले आहे असेच सहकार्य यापुढे देखील मला मिळावे हीच अपेक्षा

निवडणूक असो वा नसो, लोक आणि माझ्यातील नातं हे विश्वासाचं आणि आपुलकीचं आहे. आणि या नात्याच्या बळावर मी आज, उद्या आणि भविष्यातही लोकांसाठी, लोकांमध्ये आणि लोकांसोबत उभा राहीन.

धन्यवाद.

कार्य अहवाल सन 2021 ते 2025

मोफत आधारकार्ड अभियान
दिवाळी सरंजाम
तुमचे कुटुंब आमची जबाबदारी
कोरोना काळातील मदत आरोग्य शिबीर
1100 माता-भगिनींना मोफत महालक्ष्मी दर्शन
रक्षाबंधन
1000 मुलींना मोफत पासबुक वाटप
मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू समारंभ
पिण्याच्या पाण्याच्या टाकिंची साफसफाई
मकर संक्रात निमित्त पतंग वाटप
खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम
नवदुर्गा सेल्फी स्पर्धा
लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड
शालेय विध्यार्थ्यांना मोफत वही व छत्री वाटप
परिसराची स्वछता
पाठपुरावा

व्हिडीओ गॅलरी

+91 97637 54141

dagade.abhi5757@gmail.com

Abhijeet Rajendra Dagade Office, Near Karnataka Bank, Badhan (Bk), Pune, Tal. Mulshi Dist. Pune Pin Code 411021

अभिजीत राजेंद्र दगडे, प्रभाग क्रमांक ‌१० (अ), बावधन भुसारी कॉलनी, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ आपले सहर्ष स्वागत करीत आहे.      |      अभिजीत राजेंद्र दगडे, प्रभाग क्रमांक ‌१० (अ), बावधन भुसारी कॉलनी, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ आपले सहर्ष स्वागत करीत आहे.
  Vote For Me